वधू - वर फॉर्म

श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर आयोजित शैक्षणिक शिबीर

16 November 2022 sant santaji maharaj jagnade 195 views

     श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था गंजीपेठ, नागपूर ही संस्था समाज कार्याकरिता समाजात नावाजलेली असून विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम प्राधान्याने राबविले जातात. हुशार होतकरु गरजू गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या संस्थेकडून दरवर्षी नियमितपणे दिली जाते. विद्यार्थी, पालक, माता- पालक शिबिरात ओबीसीआरक्षण शिष्यवृत्ती, व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय पदे इ. विविध  विषयावर प्रबोधन करून व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो.

Shri Sant Jagnade Maharaj Bahuuddeshiya shaikshanik Sanstha Nagpur aayojit shaikshnik Shivir      दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवारी दि.१३ नोव्हेंबर २०२२ रोजी स.९-०० वाजता भिमदल आखाडा देवस्थान, गांधी चौक ,गंजीपेठ नागपूर येथे शैक्षणिक शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मा. किशोर वरंभे यांनी केले.शिबिरात मा. अनुज हुलके यांनी ओबीसीचे आरक्षण,मंडल आयोग ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण, ऍडमिशन, नोकरी ,प्रमोशन, शेती, उद्योग, व्यवसाय, ओबीसीची जनगणना इ.मुद्यांवर मार्गदर्शन केले. इतर मागास वर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाच्या तरतूदीपासून होणारे लाभ तसेच जातीव्यवस्था, जातीभेद, आरक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सविस्तर शिबिरात मांडली. शिबिरात सुमारे १५० विद्यार्थी-पालक-माता पूर्णवेळ सहभागी होते. प्रश्नोत्तराच्या वेळेस विद्यार्थी युवक युवती स्त्रिया पुरुषांनी प्रश्न विचारले. शंकासमाधान करण्यात आले.

Shri Sant Jagnade Maharaj Bahuuddeshiya shaikshanik Sanstha Nagpur shaikshnik Shivir     शिबिरास संस्थेचे सचिव मा.दिलीप तुपकर, कोषाध्यक्ष सुनील पंचभाई,उपाध्यक्ष गणेश हटवार, सहसचिव प्रमोद वरंभे, मंगेश सराटकर,अमोल हटवार, मा.कावडकर उपस्थित होते.याप्रसंगी आभार प्रदर्शन सुनिल पंचभाई यांनी केले.
राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.  - प्रमोद वरंभे

Shri Sant Jagnade Maharaj Bahuuddeshiya shaikshanik Sanstha Nagpur
 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram