शासकीय परिपत्रका नुसार श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सर्व शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी - खान्देश तेली समाज मंडळाची मागणी
शासकीय परिपत्रकाचे अनुकरण करावे
धुळे - तेली समाजाचे संत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सर्व शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी असे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे. मात्र, गेल्या तीन वर्षापासून धुळे शहर व जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची जयंती अथवा प्रतिमा पूजन केले जात नाही असे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे मा.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये जयंती किंवा प्रतिमा पूजन करण्याविषयी आदेशित करण्यात यावे व सर्व कार्यालयांमध्ये संताजी महाराजांचे प्रतिमापूजन करण्यात यावे अशी मागणी खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी श्री संजय गायकवाड साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली.
