वधु - वर फॉर्म

राहुरी तेली समाजाच्‍या वतीने प्रदेश तेली महासंघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान

24 November 2022 Teli samaj 66 views

     राहुरी येथे तेली समाजाच्या वतीने प्रदेश तेली महासंघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान तालुकाचे जेष्ठ नेते अरुण तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यात प्रदेश उपाध्यक्ष भागवत लुटे, रविद्र करपे यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी तसेच चंद्रकांत शेजुळ यांची अहमदनगर जिल्हा निरिक्षक पदी तसेच अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक सोमनाथ देवकर यांची अहमदनगर शहर अध्यक्षपदी निवङ झाल्याबद्दल तसेच लहानु नागले यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवङ झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रसंगी राहुरी नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष आसाराम शेजुळ, समाज भुषण नामदेव महाराज शेजुळ. आशोक शेजुळ, अरविंद दारुणकर, विजय काळे, संतोष मेहेत्रे, बाबासाहेब शेजुळ, बाळासाहेब शेजुळ, मनोह सुद्रिक, राहुरी तालुका अध्यक्ष तेली समाज दत्तात्रय सोनवणे, संजय पन्हाळे, सुरेश धोत्रे, बाळासाहेब शेजुळ, किशोर इंगळे, विजय करपे, नितीन फल्ले, पोपट ङोळसे, योगेश पतके, सुभाष शेजुळ, श्रीकांत शेजुळ, बाळकृष्ण दारुणकर, दिलीप दारुणकर, राजु शेजुळ, आणि संदिप सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच सभापती अरुण तनपुरे यांनी भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालक सुरेश शेजुळ यांनी केले. आभार कैलास शेजुळ यांनी मानले प्रसंगी राहुरी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते.

Rahuri teli Samaj Pradesh teli mahasangh Nutan padadhikari Satkar

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi