वधू - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची धुळे शहरात श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा करणेबाबत बैठक संपन्न

29 November 2022 sant santaji maharaj jagnade 91 views

     धुळे. - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची बैठक ग.नं. २, जैन मंदिरासमोर, धुळे संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक महेश चौधरी यांनी केले. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. बैठकीत नरेंद्र भाऊ चौधरी, पोपटराव चौधरी, दिनेश भाऊ बागुल, सौ. छायाताई करनकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वानमुते मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी करुया व विविध उपक्रम जयंतीनिमीत्त घ्यावेत असे ठरले. तसेच मुकेश चौधरी यांचा वाढदिवसानिमीत्त सत्कार करण्यात आला. बैठकीस श्री नरेंद्र भाऊ चौधरी, श्री कैलास भाऊ चौधरी, श्री शशिकांत भाऊ चौधरी, श्री अनिल भाऊ अहिरराव, श्री तुषार दादा चौधरी, श्री दिनेश दादा बागुल, श्री पोपटराव चौधरी, श्री रमेश भाऊ करणकाळ, श्री मनोहर चौधरी सर, श्री प्रभाकर सर चौधरी, श्री पप्पू शेट अहिरराव, श्री हिरु आप्पा चौधरी, श्री किशोर भाऊ थोरात, श्री अनिल भाऊ थोरात, श्री महेश भाऊ चौधरी, श्री मनोज भाऊ चौधरी, श्री किरण भाऊ चौधरी, श्री विनोद भाऊ चौधरी, श्री कल्पेश भाऊ थोरात, श्री विलास भाऊ चौधरी, मुकेश भाऊ चौधरी, महिला आघाडीचे सौ. वैशाली ताई चौधरी, सौ. छायाताई करनकाळ, सौ मनिषाताई सजन चौधरी, सौ मनिषाताई राजेंद्र चौधरी, सौ. अलकाताई चौधरी, सौ. निरंजनीताई चौधरी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Meeting of Maharashtra prantik Tailik Mahasabha held in Dhule city regarding celebration of Shri Santaji Jaganade Maharaj Jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab