अमरावती तेली समाज वधू-वर परिचय मेळावा २०२२
अमरावती जिल्हा तैलिक समिती, अमरावती व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अमरावती विभाग व्दारा सर्वशाखीय तेली समाज उप वधू-वर परिचय मेळावा व 'रेशीमगाठी' कुर्यात सदा मंगलम् पुस्तिका प्रकाशन सोहळा रविवार दि. २५ डिसेंबर २०२२
सर्व शाखिय तेली समाज बांधवाना सुचित करण्यात येत आहे की, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अमरावती विभाग व अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाखिय उपवर वधुवर परीचय मेळावा आयोजित केलेला आहे. तेली समाजातील उपवधु-वर यांचे परिचय असलेले "रेशीमगाठी "कुर्यात सदा मंगलम् पुस्तीकेचे प्रकाशन मा. खासदार श्री. रामदासजी तडस साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक महासभा महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षेते खाली व मा. आमदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब तथा प्रदेशाअध्यक्ष भाजपा महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते तसेच मा. आमदार श्री. रामदासजी आंबटकर साहेब, मा. आमदार श्री. अभिजीतदादा वंजारी साहेब, मा. श्री. जगदिशभाऊ गुप्ता माजी राज्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तेली समाजातील समाज भुषण मा. श्री. शंकररावजी हिंगासपुरे, मा. श्री. बाबासाहेब शिरभाते, मा. श्री. मधुकरराव डाफे, मा. अरुणभाऊ झों. गुल्हाने, मा. पंकजभाऊ गुल्हाने, मा. श्री. नितिनभाऊ गभणे, मा. संजयभाऊ जावळे, मा. श्री. अविनाशभाऊ जसवंते, मा. श्री. कैलासभाऊ गिरोळकर, मा. श्री. रामेश्वरराव गोदे, मा. श्री. किशोरराव गुल्हाने यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे तरी तेली समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहुन सहकार्य करावे ही विनंती करण्यात आलेली आहे.
