वधू - वर फॉर्म

राष्ट्रसंत 'श्री संताजी महाराज चौक' कोनशिलेचे गुरुवारी अनावरण

07 December 2022 sant santaji maharaj jagnade 100 views

    अहमदनगर : तेलीखुंट परिसरीतील चौकात 'श्री संताजी महाराज चौक' कोनशिलेचे गुरुवार दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वा. अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आमदार संग्रामभैय्या जगताप, महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, माजी उपमहापौर मालनताई ढोणे आदिंच्या प्रमुख उपस्थित होते असल्याची माहिती, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी दिली. जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या मुळ अभंग गाथेचे लेखक संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास शहरातील सर्व बंधू-भगिनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने करण्यात आले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar