Bride / Groom Form

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती वैजापुर तालुक्‍यात उत्‍साहात साजरी

08 December 2022 sant santaji maharaj jagnade 95 views

     श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लाडगाव ता वैजापुर येथे साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष श्री. मनोज धनाड सर प्रमुख पाहुणे श्री. साईनाथ सोमवंशी सर श्री.विलास निगळ सर प्रमुख वक्ता श्री.अशोक साळुंके सर श्री. चेतन राजपूत सर तसेच सर्व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते..!! यावेळी विद्यार्थी यांनी संताजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर भाषण केलीत..!! श्री.अशोक साळुंके सर यांनी आपल्या भाषणात  संताजी महाराज यांच्या अभंग, साहित्य, समाजहितार्थ कार्य तुकाराम महाराज गाथा लेखक, गुरू व शिष्य यावर सखोल मार्गदर्शन पर माहिती विद्यार्थ्यांना दिली...श्री.मनोज धनाड सरांनी संताजी महाराज यांच्या जीवनाचा आदर्श विद्यार्थी यांनी घ्यावा व आपले जीवन सुसंस्कृत बनवावे असे मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रम सुत्रसंचलन प्राध्यापक श्री.रमेश मतकर यांनी तर आभार  श्री.रविंद्र आहेर यांनी मानले.

Sant Shiromani Santaji Jaganade Maharaj Jayanti celebrated with enthusiasm in Vaijapur taluka

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav