अखिल तेली समाज संघटन निमगाव केतकी वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी
अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने निमगाव केतकी या ठिकाणी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आखिल तेली समाज संघटनेच्या वतीने निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशन येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य, बालाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमनमा. तात्यासाहेब वडापुरे यांच्या यांच्या शुभहस्ते तसेच मार्गदर्शक या. संदीपभाऊ भोंग यांच्या हस्ते निमगाव केतकी ग्रामपंचायत मधील प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


