वधु - वर फॉर्म

संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त जामनेर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

09 December 2022 sant santaji maharaj jagnade 68 views

     जामनेर: शहरातील कमल हॉस्पिटल येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते प्रमुख अतिथी म्हणून गटनेता डॉ प्रशांत भोंडे, नगरसेवक बाबुराव हिवराळे, निलेश पाटील, सोपान चौधरी, सुभाष चौधरी, डा सरताळे, कविता देशमुख, उज्वला गोसावी, रंजना धुमाळ हे मान्यवर उपस्थित होते

Free health checkup camp at Jamner on the occasion of Sant Santaji Jagannade Maharaj Jayanti      संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य शिबिरास सुरुवात करण्यात आली चंद्रकांत पाटील, वैशाली चौधरी, निलेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले

    प्रास्ताविक उत्तर महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ अध्यक्षा वैशाली चौधरी तर सूत्रसंचालन सुनील भोडे यांनी केले. आभार मयूर चौधरी यांनी मानले. या शिबिरात १५४ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदेश प्रमुख, वैशाली चौधरी, दर्शना पाटील, पल्लवी सूर्यवंशी, विना कासार, पुष्पलता पाटील, विद्या मोते, वासंती कुलकर्णी, रूपाली पाटील, सुनिता भोंडे, मनीषा चौधरी, रेखा पोळ, प्रदेश तेली महासंघ तालुकाध्यक्ष अजय चौधरी, खानदेश तेली शहराध्यक्ष निलेश चौधरी, जामनेरच्या तेली समाज पंचमंडळाचे मोहन चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj