वधू - वर फॉर्म

अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्था व वर वधू सुचक मंडळा तर्फे संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात साजरी

09 December 2022 sant santaji maharaj jagnade 147 views

    दि.8/12/2022 रोजी  नागपूर येथील नंदनवन परिसरातील जगनाडे चौकातील संत शिरोमणी श्री  संताजी जगनाडे महाराजांच्या पुतळ्याला, महाराजांजच्या जयंती निमित्त, अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्था व वर वधू सुचक मंडळा तर्फे आयोजित जयंती समारंभात तेली समाजाचे आराध्य दैवत व जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या बारा टाळकऱ्यापैकी एक व तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर अवघ्या तेरा दिवसांत आपल्या लेखणीने लिहुन काढणारे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास संस्थेचे सल्लागार व सदस्य डॉ.अशोकराव सागोते ,बबनराव तेलरांधे,गिताताई महाकाळकर व कृतल आकरे, संस्थेचे अध्यक्ष अरूणराव धांडे यांच्या कडुन हार अर्पण  करून अभिवादन करण्यात आले.

Saint Santaji Jagannade Maharaj Jayanti celebrated with enthusiasm by Akhil Teli Samaj Sanskriti Seva Sanstha and Var Vadhu Suchak Mandal    या शुभप्रसंगी संस्थेचे सचिव किशोर भिवगडे, वसंतराव खोंड,राजुजी मुंडले, श्रीकांत क्षिरसागर, पियुश आकरे, भोजराज मस्के बालु गुळघाणे, सुर्यभान चकोलेजी, पियुश आकरेजी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh