Bride / Groom Form

श्री संताजी सेवा मंडळ पालघर व संताजी सखी महिला वतीने संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्‍न

10 December 2022 sant santaji maharaj jagnade 103 views

     पालघर येथे श्री संताजी सेवा मंडळ व संताजी सखी महिला, हिरकणी महिला ग्रुप पालघर विभाग. तेली समाजाच्या वतीने सौ. स्मिताताई संतोष गव्हाडे, पालघर जिल्हा सचिव. ह्यांनी आपल्या निवासस्थानी,श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते ! त्यांनी पालघर जिल्हा, बोईसर, वानगाव, डहाणू, विरार, वसई विभागतील सर्व, सोशल मीडिया व्हॉट्सॲप द्वारे समाज बांधवांना आमंत्रण केले ! ठीक संध्याकाळी ६ वाजता, आम्ही तिथे जमलो. स्मिता ताईनी,खूपच छान अशा पद्धतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा व समई , फुलपुष्पहार पूजेचे साहित्य. सुबक आरास केली होती !! प्रतिमा पूजन पुष्पहार श्री. व्ही. डी. चौधरी यांनी केले, दीप प्रज्वलन आरती सौ,प्रेरणा श्री संजय भाऊ चौधरी व जमलेल्या इतर समाज भगिनी मिळून. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा ! खुप उत्साहात आनंदाने साजरा झाला !!

Santaji Jagnade Maharaj janmotsav Sohala sampann by Santaji Seva Mandal Palghar and Santaji Sakhi Mahila       या प्रसंगी श्री. संजय भाऊ चौधरी, सौ . प्रेरणा चौधरी, श्री. व्हीं. डी. चौधरी, सौ . ज्योती चौधरी, श्री . राजेश साहू, सौ. पूनम  साहू, सौ. सविता चौधरी, सौ. ललिता चौधरी, सौ. मनीषा कर्डिले, सौ. स्मिता गव्हाडे  इत्‍यादी  समाज बांधव उपस्थित होते.

Santaji Jagnade Maharaj janmotsav Sohala sampann by Palghar Teli Samaj

Santaji Jagnade Maharaj janmotsav Sohala by Santaji Seva Mandal Palghar

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu