वधू - वर फॉर्म

संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव नाशिक उत्साहात संपन्‍न

11 December 2022 sant santaji maharaj jagnade 119 views

     सिडको : तेली समाजातर्फे त्रिमूर्ती चौक, सिडको येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा ३९८ वा जयंती उत्सव उत्साहात साजरा करून अभिवादन करण्यात आले.
श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ, संताजी युवक मंडळ, सर्वांगीनी महिला मंडळ, सिडको विभाग यांच्यातर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सिडको तेली समाजाचे बी. जी. चौधरी यांनी केले.

    अध्यक्ष शिवाजीराव चौधरी, देवा वाघमारे, राहुल गणोरे, अर्जुन वेताळ, युवक मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, महाराष्ट्र प्रांतिक नाशिक जिल्हा महिलाध्यक्ष सुनीता बोरसे, ज्येष्ठ मार्गदर्शक संतोष चौधरी, संदीप कोते, सागर चोथेपाटील, रमेश चौधरी, मंडळाचे उपाध्यक्ष विनायक सोनवणे, सचिव वसंत चौधरी, खजिनदार नामदेव चौधरी यांनी दीपप्रज्वलन केले. कैलास चौधरी यांनी प्रास्ताविक केले. विनायक सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले तर अर्जुन वेताळ यांनी आभार मानले.

    यावेळी माजी अध्यक्ष नितीन पवार, रघुनाथ चौधरी, दिगंबर नेरकर, किशोर चौधरी, डॉ. राम बोरसे, रघुनाथ व्यवहारे, संदीप कोते, अमर व्यवहारे, अभिजीत बारगजे, शुभम नेरकर, तुषार महाले, मोहित पन्हाळे, सागर पवार तसेच सर्वांगीनी महिला मंडळाच्या संगीता कोते, संगीता पवार, ललिता रत्नपारखी, वर्षा वेताळ, सुवर्णा कोते, पुष्पा चौधरी, निर्मला चौधरी, उषा चौधरी, प्रमिला चौधरी, भारती चौधरी, प्रणाली चौधरी तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

    म्हसरुळ येथे अभिवादन

    पंचवटी : म्हसरुळ येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती गुरुवारी (दि. ८) उत्साहात साजरी करण्यात आली. मेरी म्हसरुळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी दत्तात्रय राऊत, योगेश वाघ, मेघा वाघ, नंदू जाधव, प्रकाश गांगुर्डे, ज्ञानेश्वर राऊत, मंगेश सैंदाणे, संतोष गाडगीळ, उद्धव पवार, कृषी अधिकारी जाधव, प्रतीक राऊत, प्रवीण शिंदे, राहुल जाधव, सतेज कुलकर्णी तसेच मेरी म्हसरुळ परिसरातील सर्व स्तरातील संताजी महाराज यांचे भक्तगण उपस्थित होते.

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar