वधू - वर फॉर्म

शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

12 December 2022 sant santaji maharaj jagnade 122 views

     दि. 08 / 12 / 2022 गुरुवार रोजी शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती ता.घनसावंगी जि. जालना येथे संत संताजी  जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री ज्ञानदेव सोळंके  हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवहारी कायंदे  यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर विद्यार्थी मनोगताचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन , कार्य या विषयी अमुल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. भिमाशंकर शिंदे  यांनी केले,तर आभार श्री. मच्छिंद्र देवकर  यांनी मानले.या वेळी शाळेतील विद्यार्थी ,शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saint Santaji Jaganade Maharaj birth anniversary celebration at Sharad Chandraji Pawar Secondary School Murthy

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story