Bride / Groom Form

खेडगावला संताजी महाराज पुण्यतिथी

02 January 2023 sant santaji maharaj jagnade 93 views

    खेडगाव दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे श्री संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संताजी युवक प्रतिष्ठान व संताजी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक सुरेश सोनवणे, रमाकांत सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तेली गल्ली येथून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील सांप्रदायिक वारकरी भजनी मंडळाच्या वतीने हरिनामाचा जयघोष व संताजी महाराज जगनाडे यांच्या जयजयकाराने खेडगाव नगरी आवाजाने दुमदुमली. शोभायात्रेत महिलांनी पैठणी परिधान केली होती. महिला फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रा समारोप प्रसंगी भक्तीगीत, भारूड, हरिपाठ व महाआरती होऊन महाप्रसादाच्या कार्यक्रमाने शोभायात्रेची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महासभा तालुका कार्याध्यक्ष शुभम जाधव, तालुका उपाध्यक्ष सुमित सोनवणे, विकी राऊत, चेतन सोनवणे, गौरव पवार, मयूर वाघ, तेजस पवार, स्वप्निल वाघ, सौरभ पवार, अनिकेत सोनवणे, स्वप्निल पवार आदींसह समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu