महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची नाशिक विभागीय मिटिंग संपन्न
04 January 2023 Teli samaj 47 views
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची नाशिक विभागीय मिटिग नुकतीच दि 29/12/22 वार गुरवारी रोजी अतिशय खेळीमेळीच्या वातावरण नाशिक मध्ये रोटरी क्लब हॉल येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कार्याध्यक्ष सर्वांचे जेष्ठ मार्गदर्शक आदर्श व्यक्तिमत्व श्री अशोक काका व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष समाज भूषण खासदार श्री रामदासजी तडस साहेब महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे बुलंद तोफ सर्वांचे आधारस्तंभ नाशिक महापालिकाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते समाजभूषण श्री गजाननजी शेलार नाना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे बुलंद तोफ सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव मा. डॉ. भूषणजी कर्डिले सर विभागीय 4 कार्याध्यक्ष श्री हरिभाऊ डोळसे विभागीय महिला अध्यक्ष सौ विद्या करपे सेवा आघाडीचे श्री माधवरावजी शेजुळ यांच्या उपस्थितीत व नगर जिल्ह्यातील व नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्वरुपात संपन्न झाली
या विभागीय मीटिंगमध्ये नगर जिल्ह्यातील व नाशिक जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी नियुक्त करण्यात आले विभागीय अध्यक्ष म्हणून अँड श्री शशिकांतजी व्यवहारे यांची नियुक्ती करण्यात आली त्याच बरोबर नगर जिल्ह्यातील आमचें मार्ग दर्शक आदर्श व्यक्तिमत्व संगमनेर येथील श्री प्रदीपजी कर्पे यांची नाशिक विभागीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली अकोला येथील आपले समाज बांधव महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे आदर्श व्यक्तिमत्व श्री शांतारामजी बापू काळे यांची विभागीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आमचे मित्र कोपरगाव येथील समाज बांधव श्री विलासजी वालझाडे यांची युवक आघाडीचे विभागीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आमचे मित्र नेहमी सामाजिक कामात सहकार्य करणारे ओबीसी चे धडाडीचे नेते आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व लोणी येथील आपले समाज बांधव श्री मुकुंदजी बनसोडे यांची उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली राजूर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री संतोषजी बनसोडे यांची उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली संगमनेर येथील आपले समाज बांधव तरुण तडफदार युवा व्यक्तीमत्व श्री विशालजी वालझाडे युवक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष कोपरगाव येथील आमचें मित्र माझे सहकारी संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट चे विश्वस्त धडाडीचे नेतृत्व श्री राजेन्द्रजी वालझाडे यांची कोपरगाव तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली राहाता तालुका अध्यक्ष म्हणून श्री प्रभाकरजी लुटे संगमनेर तालुका अध्यक्ष म्हणून श्री दत्ताजी शेलार अकोला तालुका अध्यक्ष म्हणून श्री देवीदासजी शेलार श्रीरामपूर येथील आपले समाज बांधव ॲडव्होकेट श्री अनीलजी सिताराम काळे यांची श्रीरामपूर तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली श्रीरामपूर येथील आपले समाज बांधव श्री संतोषजी जगन्नाथ महापुरे यांची श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली श्रीरामपूर येथील आपले समाज बांधव श्री बबनजी आढाव यांची श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली या सर्वांना मा.खासदार श्री रामदासजी तडस साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व समाज बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर्व समाज बांधवा च्यावतीने देण्यात आल्या. शुभेच्छुक - सौ विद्या करपे, नाशिक विभागीय महिला अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा
शेयर करा:
📺 संबंधित व्हिडिओ:
▶️
Click to load video
Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj