खान्देश तेली समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
07 February 2023 Teli samaj 65 views
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री मनोज मधुकर चौधरी (चिलंदे) यांची धुळे मनपा. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच धुळे शहराध्यक्ष श्री राजेंद्र भटू चौधरी यांना राज्यस्तरीय राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळाल्याबद्दल व मंडळाचे महिला आघाडीच्या नवीन निवड झालेल्या धुळे शहर सहसचिव सौ.जयश्रीताई महेश बाविस्कर यांचा सत्कार मंडळाच्या मुख्य कार्यालयात शनिवार,दि. ४ रोजी करण्यात आला.
मंडळाचे चोपडा तालुका अध्यक्ष श्री प्रकाश शंकर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली धुळे येथील गल्ली नंबर ४ मध्ये सायंकाळी मंडळाच्या मुख्य कार्यालयात सर्व मान्यवर पदाधिकारींच्या उपस्थितीत मानाची पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तिघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून सर्वांचे अभिनंदन व कौतुक करून आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, तालुका अध्यक्ष भटू पुंडलिक चौधरी, उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी, किशोर पुंडलिक चौधरी, कार्याध्यक्ष अमोल हिरामण चौधरी, मार्गदर्शक योगेंद्र नामदेव थोरात, सुभाष बापू सोनवणे, संघटक गजानन एकनाथ चौधरी, जगन्नाथ शंकर चौधरी, कमलेश कैलास चौधरी, महिला आघाडीच्या सचिव सौ. सविता प्रताप चौधरी, कार्याध्यक्ष सौ.शुभांगी मुकेश चौधरी, उपाध्यक्ष सौ. समिधा सचिन सूर्यवंशी, संघटक सौ.भारती कैलास चौधरी, सल्लागार सौ.भारती भागवत चौधरी यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सत्कारमूर्ती यांनी आभार व्यक्त करताना मंडळाला सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला. सर्वांनी एकत्र येऊन मंडळाच्या व समाजाच्या विकासासाठी संघटित होऊन काम करावे असे सर्वांनी यावेळी सांगितले.
शेयर करा:
📺 संबंधित व्हिडिओ:
▶️
Click to load video
तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj