राहता तालुका तेली समाजाची प्राथमिक बैठक उत्साहात संपन्न
अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे शिलेदार राहता तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक सदैव स्मरणात राहील असे समाज कार्याचा महामेरू आदरणीय कै. बाबुरावजी साळुंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज याअंतर्गत राहता तालुका तेली समाजाची प्राथमिक बैठक रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर कनकुरी रोड शिर्डी येथे मोठया उत्साहात संपन्न झाली.
बैठकीच्या प्रारंभी आराध्यदैवत संतश्रेष्ठ संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जयघोष करून सुरुवात झाली. यावेळी मिटिंगचे विषय वाचन करण्यात आले त्यात प्रामुख्याने मांडण्यात आलेले विषय पुढील प्रमाणे ठराव करून संमत करण्यात आले,
★ ८ मार्च महिला दिन निमित्ताने तालुक्यात विविध ठिकाणी, विविध कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन,
★ तालुका निहाय परिसंवाद यात्रा आयोजन व नियोजन,
★ सामुदायिक विवाह सोहळा आयोजन व नियोजन,
★ आपला जिल्हाध्यक्ष आपल्या दारी उपक्रम ज्यात विविध नवीन संकल्पना मांडून त्यानुसार नोंदणी करणे
★ व इतर ऐन वेळेचे विषय यावर चर्चा करण्यात आली
अ. नगर जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष अॅड. विक्रांत वाघचौरे यांनी समाज एकसंघ आणि संघटित करून समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणले असून समाज उपयोगी उपक्रम व राज्यस्तरीय मेळावे आयोजित करून अहमदनगर जिल्हा व राहता तालुका तेली समाजाचे उज्वल भविष्याकडे वाटचाल करीत असल्याचे सांगितले,
शिर्डी येथे ११ डिसेंबर २०२२ रोजी झालेला यशस्वी वधुवर पालक परिचय मेळाव्यात दोन महिन्यांत चार लग्न जमले गेले. त्याचे सर्व श्रेय तालुक्यातील समाज बांधवांना आहे त्याचाही उल्लेख बैठकीत घेण्यात आला याचेही विशेष दखल घेण्यात आली, सर्व उपस्थित प्रमुख मान्यवर व समाज बांधव यांचे आभार श्री बद्रीनाथ लोखंडे यांनी मानले
यावेळी श्री गोरख भाऊ लुटे ( रांजणगाव ) , श्री भुपेंद्र मचाले (शिर्डी), श्री रामेश्वर क्षिरसागर ( शिर्डी ) श्री प्रसाद भाऊ महाले (राहता) , श्री महेश जंजाळ (रुई) आदी समाज यांच्या विशेष उपस्थितीत राहता तालुका तेली समाजाची बैठक आनंदाच्या खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
