वधू - वर फॉर्म

सिन्नर येथील व्यावसायिक माणिकराव रायजादेंचा अपघाती मृत्यू

13 February 2023 Teli samaj 127 views

    सिन्नर, ता. ११ : सिन्नर शहरातील प्रतिथयश व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते माणिकराव रामभाऊ रायजादे (६८) यांचे बीडवरून सिन्नरकडे परत येत असताना कार उलटून झालेल्या अपघातात निधन झाला. शनिवारी (ता. ११) दुपारी हा गेवराई - औरंगाबाद दरम्यान हा अपघात झाला.

Accidental death of businessman Manikrao Raizade from Sinnar     माणिकराव रायजादे यांची बहीण व बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई क्षीरसागर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. माणिकराव रायजादे बहिणीच्या मासिक श्रद्धाच्या कार्यक्रमासाठी बीड येथे गेले होते. त्यांच्या समवेत मुलगा अॅड. प्रीतम रायजादे हे देखील होते. बीड येथून सकाळी रायजादे पिता-पुत्र सिन्नरकडे येत असताना दुभाजकाला धडकून कार उलटली. या अपघातात माणिकराव रायजादे यांचा गंभीर दुखापत व रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा सिन्नर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    सिन्नरच्या माजी उपनगराध्यक्ष वृंदाताई रायजादे यांचे ते पती, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे ते सख्खे मामा होत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे सुना व नातवंडे असा परिवार आहे. श्री. रायजादे यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजल्यावर सिन्नर शहर व तालुक्यात शोक व्यक्त करण्यात आला. व्यावसायिक असलेले रायजादे कुटुंबीय सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असल्याने त्यांच्या निवासस्थानी  दुपारपासून गर्दी झाली होती.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur mahila Pratigya