वधु - वर फॉर्म

10 वी - 12 वी बोर्ड परिक्षा काळात विद्यार्थ्यांना बससेवा वेळेत मिळावी - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर

16 February 2023 Teli samaj 72 views

    महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य यांच्या मार्गदर्शनात आज उमरेड येथील मा. आगार प्रमुख कटरे मॅडम, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना 10 वी-12 वी बोर्ड परिक्षा काळात विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गावात बस वेळेवर पोहचविण्या  बाबद निवेदन देण्यात आले  या निवेदनात त्यांना सांगितलं की ग्रामीण भागातून उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातून बहुतांश विद्यार्थी हे उमरेड येथे परिक्षेला येतात. या मुलांना परिक्षेकाळात गैरसोय होऊ नये तसेच परिक्षा केंद्रावर पोहचायला विलंब होऊ नये. त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक गावी बस पोहचवुन मुलांना सूविधा देण्यात यावी.

Students should get bus service on time during 10th - 12th board exams - Maharashtra prantik tailik Mahasabha Nagpur     तसेच जिथे कुठे शालेय मुलांनी बसला हात दाखविताच ती बस थांबविण्यात यावी जेणेकरून विद्यार्थी परीक्षेला वेळेवर पोहचू शकेल असे आदेश द्यावेत ही विनंती केली याप्रसंगी निवेदन देत असताना संघटनेचे तालुका अध्यक्ष अंकुश बेले, युवा आघाडी विभागीय सचिव संजय घुगुस्कर, महिला आघाडी अध्यक्ष गीता आगासे, प्रणिता पडोळे, प्रभाकरराव बेले, सुधाकर पडोळे, चेतन पडोळे, वैशाली बांद्रे, मनीषा मुंगले, सोनल बालपांडे, सोनाली चंदनखेडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh