वधु - वर फॉर्म

सांगली जिल्हा व मिरज तालुका लिंगायत तेली समाज आयोजित भव्य राज्यव्यापी लिंगायत तेली समाज वधू-वर मेळावा २०२३

06 March 2023 teli samaj vadhu var melava 71 views

सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत मिरज तालुका लिंगायत तेली समाज यांच्या वतीने

     महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील बंधू - भगिनींना कळविण्यात येत आहे की, यंदा ज्यांना "कर्तव्य" आहे अशा इच्छुकांकरिता समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्‍यात आलेला आहे, तसेच आपल्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष मा. शशिकांत (आण्णा) फल्ले यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यांना त्यांच्या समाजाला दिलेल्या योगदानाबद्दल सांगली जिल्हा आणि मिरज तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना मरणोत्तर समाजभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे, तसेच २०२३ सालामध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा व जिल्हामध्ये विविध पदावर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणेत येणार आहे, तरी सर्व समाजबांधवांनी उपस्थित रहावे ही विनंती समाज बांधवानाकरण्‍यात आलेला आहे.

    कार्यक्रमाचे स्थळ शाही दरबार हॉल, मिरज मार्केटजवळ, टाकळी रोड, मिरज तारीख व वेळ रविवार, दि. ०२/०४/२०२३ रोजी, सकाळी १०.०० ते सायं. ६.०० वा. कार्यक्रम सकाळी १० पासून नाव नोंदणी, सकाळी ११ वा. कार्यक्रमाचे उद्घाटन व वधू वर परिचय दु. १२ ते २ भोजन, दुपारी २ नंतर वधू वर परिचय

Sangli District and Miraj Taluka Lingayat Teli Samaj Organized Grand Statewide Lingayat Teli Samaj Vadhu Var Parichay melava

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

maa Karma Devi jayanti maha aarti Bemetara Sahu samaj