खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीचा अभिनव उपक्रम - महिला दिनाचे दिवशी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा सत्कार
10 March 2023 jalgaon teli samaj 62 views
धुळे - संपूर्ण खान्देशातील तेली समाजामध्ये नावलौकिक प्राप्त असलेल्या खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या पदाधिकारींनी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाचे दिवशी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा सत्कार करून एक अभिनव उपक्रम राबवला व आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.
धुळे शहरामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या अमोल मॅटर्निटी हॉस्पिटल या ठिकाणी आज मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व महिला दिनाच्या दिवशी जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत करण्यात आले. खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या जिल्हा सचिव सौ.सविता प्रताप चौधरी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
सौ. हर्षदा शाम ठाकूर,सौ. स्वाती मनचोर या मातांचा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.कल्पना अशोक चौधरी,सौ.भारती कैलास चौधरी, महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष श्रीमती आशा अजय चौधरी, सौ. वंदना मोतीलाल चौधरी, सौ. रिटा बागुल, सौ. प्रतिभा चौधरी व पदाधिकारींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
शेयर करा:
📺 संबंधित व्हिडिओ:
▶️
Click to load video
नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस … शाहिर संभाजी भगत