सामाजिक एकोप्यासाठी अभिमान सोडा - रमेश उचित
मालेगाव महानगर तेली समाजाच्या वतीने ज्येष्ठ समाज बांधव सत्कार सोहळा
मालेगाव महानगर तेली समाज आयोजित ज्येष्ठ समाज बांधव सत्कार सोहळ्याप्रसंगी महानगर तेली समाज अध्यक्ष रमेश उचित बोलत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तेली समाजाच्या ८५ ज्येष्ठ समाजबांधवांचा समारंभप्रसंगी पुरुषांना धोतर शर्ट पॅंट पायजमा तर महिलांना साड्या प्रदान करण्यात आल्या. व आतापर्यंत आयुष्य चांगले गेल्याबद्दल फुले देण्यात आली व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.यात ९६ वर्षाची वृद्ध महिला-रेणाबाई पुंजाराम चौधरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आतापर्यंत खानेसुमारी करुन गुणवंतांचे सत्कार,आयोजित करुन प्रबोधन व जागृती करणे सुरु आहे. वार्डावार्डात फिरुन समाज बांधवांना एकत्र आणुन त्यांच्यामध्ये समाजसेवेची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. आता रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत.
यावेळी सुनिल चौधरी यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन निवड झाली तसेच विजय चौधरी यांची संजय गांधी निराधार योजना सदस्य म्हणुन निवड झाली यासाठी त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी राजेंद्र सखाराम ,अंबादास चौधरी,राहुल पवार, मधुकर गायकवाड,राजेश बडवणे पंकज नेरकर,कमलेश सुर्यवंशी,मोहन पवार ,सुनिल खंडागळे,तुळशीराम वेताळ,दिपक गुप्ता,बद्रीनाथ नेरकर ,कमळाकर चौधरी ,प्रविण चौधरी,ताराचंद वेताळ अशोक सुर्यवंशी ,संजय उचित,आबा बागुल,डॉ.दिपक चौधरी,हेमंत कर्डीले, प्रभाकर व्यवहारे, निवृत्ती बागुल इ.नी परिश्रम घेतले.
मोबाईलवर आमंत्रणे देऊनही एवढा चांगला प्रतिसाद मिळाला .ज्येष्ठांच्या सन्मानप्रसंगी महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोतिलाल जाधव होते. सुत्रसंचलन अशोक वेताळ यांनी केले तर आभार दगा चौधरीनी मानले.
