Bride / Groom Form

संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी आयोजीत जागतिक महिला दिन संपन्‍न

12 March 2023 sant santaji maharaj jagnade 134 views

    संताजी संताजी ब्रिगेड तेली समाज  महासभा महिला क्रांती आघाडीचे जागतिक महिला दिन 11/03/2023 दुपारी 1 वाजता संपन्न. नामदेवराव रोकडे संताजी सभागृह गरोबा मैदान छापरू नगर नागपूर येथे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी नागपूर शहर तर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांचा उत्साह वाढविण्याकरिता रक्तदान शिबिर विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. रक्तदान करण्यास अनेक महिलांनी उत्सपूर्तपणे सहभाग घेतला.

Santaji Brigade Teli Samaj Mahasabha Mahila Kranti Aghadi aayojit jagtik Mahila Din    कार्यक्रमाचे  उद्घाटक - श्रीमती संगीता ताई तलमले ( कार्याध्यक्षा संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा) अध्यक्षा - श्रीमती प्रतिभाताई खोब्रागडे( सहसंघटक प्रमुख विदर्भ महिला क्रांती आघाडी) सौ कविता रेवतकर (अध्यक्षा नागपूर जिल्हा महिला क्रांती आघाडी), सौ शोभा जयपुरकर (सचिव नागपूर शहर महिला क्रांती आघाडी) व प्रमुख उपस्थिती संस्थापक  मा.श्री.अजयभाऊ धोपटे कोषाध्यक्ष श्री. रुपेश तेलमासरे, सदस्य श्री. रमेश वंजारी,  सदस्य  श्री. नंदूजी धोपटे, सह संघटक प्रमुख श्री. मंगेश साकरकर, नागपूर शहर उपाध्यक्ष श्री.  सुनील मानापुरे, यांच्या हस्ते, विजय ठरलेल्या महिलांना, विशेष बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

   सत्कारमूर्ती - सुशीलाताई घाटोडे  पहेलवान शेलोकर उषा बालबुधे विद्या ताई बालबले , इतर क्षेत्रातील अनेक महिलांचा सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सौ चित्रा माकडे (प्रभारी नागपूर शहर क्रांती आघाडी), प्रस्तावना सौ, मनीषा वंजारी( उपाध्यक्ष पूर्व नागपूर), आभार प्रदर्शन सौ. रजनी वैरागडे (उपाध्यक्षा मध्य नागपूर), पारितोषिक विभाग सौ. सोनाली टिकले व प्रणिता वैरागडे, रंगारंग कार्यक्रम कंमिती सौ. नर्मदाताई तडस, सौ. सोनल बावनकुळे, सौ. प्रणोती मानापुरे, सौ. मोना वैरागडे, सौ. डॉ. लीना मेंढेकर, सौ.पूर्णिमा धोपटे, सौ. नीलिमा तेलमासरे, सारिका ताटे, मंगला चारडे, मनीषा कवाडकर, नीता बागवाले, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu