वधु - वर फॉर्म

संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा मौदा आयोजित जागतिक महिला दिन उत्साहात संपन्‍न

12 March 2023 sant santaji maharaj jagnade 19 views

   मौदा . संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा, मौदा तालुकाध्यक्ष कामिनी प्रल्हाद हटवार यांच्या संकल्पनेतून अरोली येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संकटांना न डगमगता धैर्याने तोंड देणाऱ्या मंगला खरवडे, लता जुमडे, रोशनी हटवार या महिलांचा कामिनी हटवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिलांचा उत्साह वाढविण्याकरीता काही विविध स्पर्धाही घेण्यात आल्या.

International Womens Day organized by Santaji Brigade Teli Samaj Mahasabha Mauda concluded with enthusiasm    धुलीवंदनानिमित्त घेण्यात आलेल्या टेडी गेममध्ये जया देशमुख या विजयी ठरल्या. त्यांना ग्रा.पं.सदस्या वैशाली निमकर यांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती मेहर तर आभार प्रदर्शन रोशनी हटवार यांनी केले. कार्यक्रमाला ग्रा.पं. सदस्य वैशाली निमकर, लता पानतावणे, मोनिका मलधाम, माधुरी निमकर, श्वेता आकरे, कुसुम गांधी, आशा यावलकर, ज्योती देशमुख, जया देशमुख, प्रमिला भैसारे, प्रीती शिवणकर, सोनू भिवगडे, माधुरी डोंगरे, वर्षा मानकर, अंजली निमकर, गीता उमप, विना शिवणकर, सुषमा खोबरे, श्रेयशी निमकर, संगीता निमकर, प्रीती यावलकर, सिंधू राऊत, लक्ष्मी कलेघंटी, कुमारी चीलकुरी, मंगला खरवडे, लता जुमडे, ज्योती मेहर यांचेसह कोदामेंढी येथील महिला उपस्थित होत्या.

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Oil Making