जळगाव तेली प्रीमियर लीग स्पर्धेत हॉटेल अतिथीचा संघ प्रथम
16 March 2023 sant santaji maharaj jagnade 53 views
जळगाव : तेली समाजातर्फे शिवतीर्थ मैदानावर आयोजित तेली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धांचा नुकताच समारोप झाला. या स्पर्धेमध्ये १२ संघांनी सहभाग नोंदवला. हॉटेल अतिथी संघाने प्रथम, भारत प्रिंटर संघाने द्वितीय तर नागाई फाउंडेशन संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धांचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती, भुसावळचे सभापती सचिन चौधरी, नगरसेवक मनोज चौधरी, किशोर चौधरी, डी. ओ. चौधरी, प्रदीप चौधरी, मणिलाल चौधरी, दिगंबर पाटील, पांडुरंग महाले, निर्मला चौधरी, बेबाबाई सुरळकर, शोभा चौधरी, नगरसेविका चेतना चौधरी, अशोक चौधरी, गणेश सोनवणे, दिलीप चौधरी, पितांबर चौधरी, योगराज चौधरी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. समारोपप्रसंगी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी व बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे उद्योजक विजय चौधरी, संतोष चौधरी, विनोद चौधरी, बबन चौधरी, तन्मय चौधरी, गिरीश चौधरी, पंकज चौधरी, बाळू चौधरी, सुभाष चौधरी, निलेश चौधरी, अॅड. प्रफुल महाले, दपाडू चौधरी, अॅड. महेंद्र चौधरी, बंटी चौधरी, संजय चौधरी, गजानन महाले, अनिल चौधरी, पद्माकर पाटील, रामचंद्र चौधरी, दिगंबर चौधरी, मधुकर चौधरी, अमोल चौधरी, आनंद चौधरी आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी चेतन चौधरी, विशाल पाटील, मनोज चौधरी, प्रशांत सुरळकर, सागर चौधरी, जितेंद्र चौधरी, मोहित चौधरी, राहुल चौधरी, मयूर चौधरी, प्रसाद चौधरी, रवींद्र तायडे, उमेश चौधरी, मंगेश चौधरी, कमलेश चौधरी, हितेश चौधरी, नयन चौधरी, आशिष चौधरी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रशांत सुरळकर यांनी केले. आभार विशाल पाटील यांनी मानले.
शेयर करा:
📺 संबंधित व्हिडिओ:
▶️
Click to load video
PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं