वधु - वर फॉर्म

राज्य तेली समाज समन्वय समितीचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्‍न

05 April 2023 teli samaj vadhu var melava 33 views

    अकोला : राज्य तेली समाज समन्वय समितीचा वधू-वर परिचय मेळावा शनिवारी येथील प्रमिलाताई ओक सभागृह येथे आनंदात झाला.

    कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार रामदास आंबटकर हे उपस्थित होते. राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजन समितीचे प्रा. प्रकाश डवले, प्रशांत शेवतकर, बालमुकुंद भिरड, डॉ. पूजा धांडे, अॅड. किशोर लांजेवार, रमेश गोतमारे, गोपाल राऊत, ललित भगत, अभय बिजवे, मनोज साकरकार, रामेश्वर वानखडे, शशिकांत चोपडे, अनिल वानखडे, मेघा साठवणे, संजय वानखडे, योगेश गोतमारे, राजू भिरड, डॉ. नितीन बोराखडे, डॉ. आनंद पांडव, डॉ. पार्थ गवात्रे, विकास राठोड, नीलेश कपले हे उपस्थित होते.

rajya Teli Samaj samanvay Samiti Vadhu var melava sampann     संताजी महाराजांच्या पूजनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. मेळाव्यामध्ये पूर्णतः डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली होती. विशाल स्क्रीनवर समाजातील मुलामुलींचे बायोडाटा व फोटो दाखवण्यात आले. बायोडाटा स्वीकारण्यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर झालेला होता. दिवसभर शिस्तबद्ध चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये नाशिकपासून तुमसरपर्यंत समाजबांधवांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. ५ एप्रिलनंतर सर्व समाजबांधवांना डिजिटल पुस्तिका मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे आयोजन समितीतर्फे सांगण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या मृणाली डवले, ज्योती शेवतकर, शीतल गोतमारे, प्रियंका राठोड, दीपाली वानखडे, श्वेता तायडे, वैशाली निवाने, ज्योती खेडकर, नंदा झगडे, बलिंगे, राधा पांडव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या डिजिटलायझेशनची धुरा व संचालन प्रशांत शेवतकर यांनी निवेदन अनिल वानखडे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. अभिजित डवले यांनी केले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav