वधु - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे जिल्हा महिला आघाडी आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळा व भव्य महिला मेळावा

27 April 2023 Teli samaj 82 views

     धुळे - धुळे जिल्हा महिला आघाडी तर्फे तेली समाजातील श्रमकरी, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, आदि महिलांचा नारी शक्ती सन्मान सोहळा व  भव्य महिला मेळावाचे शनिवार दि. २९ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ वाजता धुळ्यातील चंद्रशेखर आझाद नगर भागातील दाता सरकार मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले असून यावेळी महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी व विरोधी पक्षनेत्या सौ. कल्पना काकू महाले यांच्यासह मोठ्या पदावर नियुक्त मान्यवरांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात  सहभागी सर्व महिलांना भेट वस्तू देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष सौ. छायाताई कल्याण करनकाळ, सौ. वैशालीताई नरेंद्र चौधरी (म.प्रा.ता. महासभा विभागीय कार्याध्यक्ष), सौ. हेमलता अनिल चौधरी, सौ. मनिषाताई राजेंद्र चौधरी, सौ. शोभाताई किशोर थोरात, सौ. नलिनीताई रमेश करनकाळ, सौ. दिपालीताई तुषार चौधरी, सौ. मनिषाताई सजन चौधरी, सौ. सरोजताई विलास चौधरी, सौ. मिनाताई चौधरी (साक्री ता. अध्यक्ष), सौ. अलकाताई नटराज चौधरी, सौ. प्रियंका कल्पेश चौधरी, सौ.वर्षाताई गणेश चौधरी, सौ. उषाताई प्रकाश चौधरी, सौ. संजनाताई कल्पेश चौधरी, सौ. आशाबाई महेश चौधरी, सौ. अलकाताई रघुनाथ चौधरी, सौ. रिटाताई प्रदिप बागुल, सौ. डॉ. योगीताताई योगेश चौधरी, सौ. निरांजनी विनोद चौधरी,सौ. संगीताबाई भागचंद्र चौधरी,  सौ. तृप्ती कुणाल चौधरी, सौ. निशा सौरभ चौधरी, सौ. शोभाताई नेरकर, सौ. सरला ताई बागुल, सौ. कल्पना सुभाष चौधरी, सौ. अर्पणा मनोहर चौधरी, सौ. विजया भटू चौधरी, सौ. सेजल सम्राट ठाकरे, सौ. सरलाताई देविदास महाले, सौ. योगीता अनिल चौधरी, सौ. सुनिता प्रभाकर चौधरी,  सौ. लता राजेंद्र करनकाळ, सौ. कल्याणी पंकज बागुल, सौ. प्रतिभाताई बापू चौधरी, सौ. कविता जितेंद्र चौधरी, सौ. कविता गोपाल चौधरी, सौ. संगीता जगदीश चौधरी, सौ.कविता कैलास चौधरी, सौ. रेखाताई भानुदास चौधरी, सौ. रत्नाताई चौधरी आदि पदाधिकारी यांनी केले आहे.सदर कार्यक्रमकरिता महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सेवा आघाडी, वकिल आघाडी, जेष्ठ आघाडी, युवा आघाडी, डॉक्टर आघाडी सहकार्य करित आहेत.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala