Bride / Groom Form

खान्देश तेली समाज मंडळ आयोजित गुरु गौरव सोहळा २०२३

26 July 2023 Teli samaj 82 views

मा. श्री धनंजय मुंडे व मा. श्री अमोल मिटकरी उपस्थित राहणार

     धुळे - खान्देश तेली समाज मंडळ आयोजित खान्देशस्तरीय गुरु गौरव सोहळा रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी धुळे महानगरामध्ये आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.श्री धनंजयजी मुंडे व अकोला जिल्ह्यातील आमदार मा.श्री अमोलजी मिटकरी यांची उपस्थिती राहणार आहे. मा.मुंडे व मिटकरी साहेब यांच्या हस्ते सर्व सन्माननीय शिक्षक-शिक्षिकांचा गौरव करण्यात येणार आहे.

     मंडळाचे अध्यक्ष श्री कैलास आधार चौधरी, कार्याध्यक्ष श्री मनोज मधुकर चौधरी, तैलिक युवक महासभेचे राज्य सचिव श्री नरेंद्र बारकू चौधरी, श्री चंद्रकांत श्रीराम चौधरी, श्री किशोर कुंडलिक चौधरी यांनी मुंबई येथे दोन्ही मान्यवरांची भेट घेऊन त्यांना आमंत्रित केले. दोन्ही मान्यवरांनी कार्यक्रमास येण्याचे आश्वासित केलेले असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे संदर्भात त्यांनी  मंडळाच्या शिष्टमंडळास सांगितले.शिष्टमंडळा सोबत मा . श्री इर्षाद जहागीरदार उपस्थित होते. असे मंडळाचे सचिव श्री रवींद्र जयराम चौधरी यांनी कळवले आहे.

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh