वधू - वर फॉर्म

तळेगावच्या ऋत्विक बारमुखला नासाचे निमंत्रण

26 July 2023 Teli samaj 113 views

      तळेगाव दाभाडे,: तळेगावचा सुपुत्र डॉ. ऋत्विक बारमुख याची चौथ्या नासा स्टार प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. अंतराळ तंत्रज्ञान वापर व संशोधन या विषयावर १९ सप्टेंबर २०२३ ते २७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत परिषदा व चर्चासत्रे होणार असून त्यात ऋत्विकला सहभागी होता येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये अंतराळ जैवविज्ञान, अंतराळ किरणोत्सर्ग, खुले विज्ञान, उड्डाण कार्यक्रम व्यवस्थापन, उड्डाण एकात्मिकता, संख्या व गणना विश्लेषण या विषयांवर चर्चा केल्या जातील. ऋत्विक हा बुद्धिमान शास्त्रज्ञ सध्या अंतराळात शेती कशी करता येईल यावर विचार करीत आहे. तो. ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे सध्या कार्यरत आहे. आयुर्वेदिक औषध विक्रेते केतन बारमुख यांचा तो सुपुत्र होय.

NASA invitation to Ritvik Barmukh of Talegaon

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar