तेली समाजाचे नव नियुक्त प्रदेश अध्यक्ष बद्रीमामा लोखंडे यांचा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व तेली समाजाचे जेष्ठ नेते श्री बद्रीनाथ मामा लोखंडे यांची अखिल भारतीय तेली महासभा या तेली समाजाचे राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष पदी राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबूलालजी राठोड साहेब यांच्या शिफारशी नुसार निवड करण्यात आली.
यावेळी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने शिर्डी शहरातील जेष्ठ मार्गदर्शक श्री विलास आबा कोते पा., कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री ज्ञानेश्वर आबा गोंदकर पा., शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री शिवाजीराजे गोंदकर पा., शिर्डी शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सचिन भाऊ शिंदे पा., भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष श्री अॅड विक्रांत वाघचौरे, भाजपा अल्पसंख्याक सेलचे श्री शब्बीरभाई सय्यद, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे तालुका अध्यक्ष श्री राकेश भोकरे पा. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
यावेळी अखिल भारतीय तेली महासभेच्या वतीने माझ्या सारख्या अतिशय लहान कार्यकत्यावर मोठा विश्वास दाखवला आहे व जी जबाबदारी दिली आहे व प्रदेशअध्यक्ष पदी माझी निवड केली ती माझ्याकडून पुर्ण विश्वासाने पूर्ण करेल व समाज पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेन ही माझ्या सामाजिक कामाची पावती मला मिळाली आहे ती सर्व माझ्या सहकाऱ्यांमुळेच शक्य झाली आहे आणि त्याच बरोबर मी माझ्या सहकाऱ्यांना देखील निःसंकोचपणे पुढे घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करेन असे बद्रीमामा लोखंडे यांनी सांगितले, तेली समाजाचे मोठे पद शिर्डी शहरातील ग्रामस्थांस मिळणे हे शिर्डी शहराचे भाग्य असून त्याचा शिर्डी ग्रामस्थ म्हणून अभिमान वाटतो असे नगराध्यक्ष शिवाजी राजे गोंदकर यांनी मत व्यक्त केले,
यावेळी भाजपा मीडिया सेलचे पंडित गुढे, रमेश बिडवे, गणेश जाधव, मंगेश खामकर, अनिल चौधरी, महेश मगर, पांडुरंग बोर्डे, सुभाष यादगुडे, यशवंत वाघचौरे, शशिकांत महाले, प्रशांत कवडे, दीपक चौधरी, दिलीप चौधरी आदी शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.
