Bride / Groom Form

राहुरीत राजूर ते शिंगणापूर तेल कावड यात्रेचे स्वागत

31 August 2023 Teli samaj 103 views

     राहुरी - सालाबाद प्रमाणे शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी राजूर ते शनिशिंगणापूर तेल कावड यात्रेचे राहुरी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेली समाजाच्यावतीने आणि राहुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे यांच्या हस्ते कावड यात्रेस तेल अर्पण करण्यात आले. या वेळी नामदेव महाराज शेजूळ, सदाशिव पवार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि मोरे, माजी उपनगराध्यक्ष आर. आर तनपुरे, वाय. एस. तनपुरे, रवींद्र कोरडे, दीपक तनपुरे, मधुकर भुजाडी, रावसाहेब तनपुरे, विठ्ठलराव तमनर, अनिल डावखर, अमित पुंड, दत्तात्रय सोनवणे, शिवाजी पाबळकर, संजय पन्हाळे, आकाश महांडुळे, अजय तनपुरे, संदीप सोनवणे, कावडप्रमुख शिवाजी पाबळकर, राजेंद्र चोथवे, मधुकर पाबळकर, निखिल चोथवे, नितिन बनसोडे, हिरामण घाटकर, दिनेश चोथवे, गोरख कर्डिले, रोहित कदम, मयुर राऊत, समर्थ चोथवे, समर्थ पाबळकर, समर्थ फले, दर्शन घाटकर, हर्षित मेहता, गणेश घाटकर आदी उपस्थित होते. यावेळी कावड भक्तांना अल्पोपहार देण्यात आला.

Welcome_to_Rajur_to_Shingnapur_Teli_Kavad_Yatra_-_Rahuri

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994