वधू - वर फॉर्म

जवाहर विद्यार्थी गृह नागपूर गुणवंत सत्कार सभारंभ संपन्‍न

17 September 2023 Teli samaj 117 views

अवघा समाज जाणतो तुमच्या यशाची चाहूल, उन्नती आणि प्रगतीच्या दिशेने आपले सतत पडत राहो पाऊल...

     रामटेक : जवाहर विद्यार्थी गृह संस्थेतर्फे शालांत परीक्षेत मेरिट आलेल्या गुणवंतांचा, Ph.D. प्राप्त व CA उत्तीर्ण गुणवंतांचा, क्रिडा क्षेत्रातील गुणवंतांचा तसेच संस्थेच्या ज्येष्ठ आजीवन सभासदांचा विशेष सत्कार पश्चिम नागपूरचे आमदार विकासभाऊ ठाकरे, प्रा. डॉ. संजय ढोबळे, सौ. दिपाताई हटवार, मा. बाबूरावजी वंजारी यांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी मा. रमेशभाऊ गिरडे होते. यावेळी सौ कांचनमाला मोरेश्वर माकडे यांची ग्राहक संरक्षण परिषद नागपूर येथे कलेक्टर नागपूर जिल्हा यांच्याद्वारे तीन वर्षासाठी नियुक्ती झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला. सुत्र संचालन प्रदीप लाखे, प्रास्ताविक शंकरराव भुते आणि आभारप्रदर्शन मिलिंद माकडे यांनी केले. यावेळी श्री गुलाबराव जुननकर, शेषराव सावरकर, घवघवे, टापरे, ढोबळे, सौ बबिता मेहर, प्रमोद महाजन, दादा इटनकर, कामडे, आस्था जंजाळ, आर्या जंजाळ, अजय धोपटे, सुनील मानापुरे, चन्ने, रोकडे, वंजारी, चकोले, रामू वंजारी, बोरकर, महाकाळकर, साठवणे, नाना ढगे, सावरकर संताजी ब्रिगेड नागपूरचे सचिव श्री अजय धोपटे व भैयालाल माकडे व समाजातील अन्य मान्यवर मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते. यातच रामटेकच्या दोन दहाव्या वर्गातील जुळ्या भगिनी कुमारी जौजाळ ९४% गूण यांचे सत्कार करण्यात आले

Jawahar Vidyarthi Gruha Nagpur gunvant Satkar samarambh sampann      कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन केल्याबद्दल जवाहर विद्यार्थीगृहाचे आयोजक समाजबांधवाचा चेहयावर वेगळाच उत्साह व आनंद यावेळी बघायला मिळाला. समस्त आयोजक समितीचे मनापासून अभिनंदन.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज को बदनाम आपमानीत करने का नया षंडयंत्र ? कोल्हू / तेल घाणा की सच्चाई क्या है ? | Teli Samaj