Bride / Groom Form

हिंसक मराठा आरक्षण आंदोलनांचा तेली समाजाच्‍या वतीने निषेध

03 November 2023 O.B.C. 109 views

     बीड येथे झालेल्या जयदत्तआन्ना क्षीरसागर राष्ट्रीय अध्यक्ष तैलिक महासभा व आमदार संदिप भैया क्षीरसागर यांच्या घरावर झालेल्या प्राणघातक हल्ला व जाळपोळ याचा निषेध म्हणून माननीय जिल्हाधिकारी व एस.पी यांना निवेदन आज दिनांक 2/11/2023 गुरुवार रोजी दुपारी 12:00 नवीन जिल्हाधिकारी कार्यालय लातुर येथे निवेदन  मा. विजयकुमार ढगे साहेब उपजिल्हाधिकारी (R.D.C) यानां पोलीस अधीक्षक यानां  म.प्रा.तैलीक महासभा,वीरशैव तेली समाज लातुर व लातुर जिल्हा तेली समाज सेवाभावी संस्था व शिवा लिंगायत युवक संघटना लातुर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Violent Maratha reservation agitation protested on behalf of Teli OBC community      यामध्ये शिवा लिंगायत युवक संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद पाटील तसेच सुदर्शन बिराजदार संस्थापक अध्यक्ष लिंगायत महासभा, माजी. नगरसेवीका सौ.छायाताई चिंदे, सेवाभावी संस्था अध्यक्ष बाळासाहेब व्होनखांबे, म. प्रा तैलिक महासभा लातूर जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ खडके, वीरशैव तेली  समाज अध्यक्ष किशोर भुजबळ, ॲ. अजय कलशेट्टी, अनिल कलशेट्टी, उमाकांत राऊत, शिवशंकर क्षीरसागर, होकळे, हरनाळे सर, नंदकिशोर लोखंडे, भागवत कोरे व तसेच जि. महिला अध्यक्ष सौ. शुभांगी राऊत, सौ. साखरे मॅडम, सौ. बबीता खडके व सर्व तेली समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar