वधु - वर फॉर्म

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, तेली समाजाचे तहसीलदारांना निवेदन

05 November 2023 Teli samaj 56 views

     अखिल भारतीय तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर, कार्यालयावर व कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांना त्वरीत अटक कारवाई करावी यासाठी येथील तेली चौधरी समाजातर्फे तहसीलदार महेंद्र माळी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, अखिल भारतीय तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या बीड येथील घरावर भ्याड हल्ला करण्यात आला. हल्ल्यावेळी घरात कुटुंब उपस्थित होते. तसेच त्यांच्या कार्यालयाचीही जाळपोळ करण्यात आली. गुंड प्रवृतीच्या लोकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ तीव्र निषेध करतो. भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांचा तात्काळ शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. प्रशासनाने कायदेशीर कारवाई न केल्यास महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघातर्फे संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Take action against those who attacked former minister Jayadutt Kshirsagar house - Shamkanth Ishi

     निवेदन देतेवेळी प्रदेश तेली महासंघाचे कार्याध्यक्ष शामकांत ईशी, तालुकाध्य क्षरमेश चौधरी, युवक आघाडी जिल्हा सचिव नरेश चौधरी, जितेंद्र सोनवणे, कुवे येथील सुनिल चौधरी, न.पा. शिक्षण मंडळ प्रमुख मोहन चौधरी, शिक्षण मंडळ सदस्य सुरेश चौधरी, खान्देश तेली समाज शहराध्यक्ष नरेंद्र चौधरी, दिनेश चौधरी, अरुण चौधरी, शिरीष चौधरी, ईश्वर चौधरी, विजय मोहन चौधरी, धनंजय चौधरी, दगडू चौधर, ज्ञानेश्वर चौधरी, तेली समाज पंच मंडळ सदस्य सुरेंद्र चौधरी, विजय चौधरी, आकाश चौधरी, लालचंद चौधरी, सोहन चौधरी, प्रतिक ईशी, चंद्रकांत चौधरी, यश चौधरी, गोविंद चौधरी, विठोबा चौधरी, मयुर येशी, किरण चौधरी, लंकेश गांगुर्डे, सुनिल चौधरी, नाना चौधरी, सचिन चौधरी, प्रकाश चौधरी, राकेश चौधरी, हर्षल चौधरी, वेदांत चौधरी, दिपक चौधरी, यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994