Bride / Groom Form

योगिता पिपरे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा विभाग महिला आघाडी उपाध्यक्षपदी

06 November 2023 Teli samaj 105 views

     गडचिरोली : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा विभागीय बैठक नागपूर येथील जवाहर विद्यार्थी सभागृह येथे २८ ऑक्टोबर रोजी पार पडली. यावेळी योगिता पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभाग महिला आघाडी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

Yogita Pipre Maharashtra Provincial Tailik Mahasabha Division Womens Alliance Vice President      गडचिरोली जिल्ह्यात समाजासाठी चांगले कार्य केल्याबद्दल समाजातील एक क्रियाशील कार्यकर्ते व समाजकार्यात मोलाचे योगदान असल्यामुळे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉ. भूषण कर्डिले, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे सहसचिव बळवंतराव मोरघडे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीचे विदर्भ संघटक माधुरी तलमले यांच्या हस्ते उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देऊन संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली.

    याप्रसंगी कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, कोषाध्यक्ष गजानन शेलार, सहसचिव संजीव शेलार, युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर, युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष अतुल वांदिले, गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकारी, सभासद व समाज बांधव उपस्थित होते. योगिता पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभाग महिला आघाडी उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व समाज बांधवांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj