Bride / Groom Form

तेली समाजाचे वरिष्ठ नेते बाबूराव वंजारी यांचे निधन

06 November 2023 Teli samaj 239 views

     नागपूर : तेली समाजाचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक, तेली समाज सभेचे अध्यक्ष व नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबूराव अंतूजी वंजारी यांचे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. २० वर्षांपासून ते तेली समाज सभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी गंगाबाई घाट येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Senior Teli Samaj leader Baburao Vanjari passed away

     यावेळी शोकसभेला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, किशोर गजभिये, विशाल मुत्तेमवार, हरिभाऊ किरपाने, गिरीश पांडव, पुरुषोत्तम हजारे, रमेश गिरडे, किशोर वरंभे, विनोद टिकले, नितीन कुमलकर उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक