Bride / Groom Form

धुळे येथील तेली समाज वधूवर मेळाव्यात मालेगाव तेली समाज बांधवाचा गौरव

01 December 2023 sant santaji maharaj jagnade 98 views

    मालेगावचे सुपुत्र राहुल यशवंत चौधरी चा धुळे येथे सत्कार करण्यात आला. खानदेश तेली समाज आयोजित वधूवर मेळाव्यात राहुल चौधरीने धुळे येथील शिवपुराण प्रसंगी केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल धुळे तेली समाजातर्फे राहुल चौधरीला व्यासपीठावर गौरविण्यात आले . राहुल चौधरी व सार्व.बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांचा शिवपुराण नियोजनात मोठा  वाटा होता. राहुलच्या योगदानाबद्दल शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी गौरवोद्गार काढले.

Malegaon teli Samaj Gaurav by Dhule teli Samaj Vadhu var melava     यावेळी खानदेश तेली मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी राजू नाना महाले ,छोटूभाऊ चौधरी वलवाडी,गुड्डू अहिरराव,चंन्दुभाऊ चौधरी,राकेश नाना चौधरी , शामभाऊ चौधरी ,महापौर प्रतिभा ताई चौधरी , विरोधी पक्ष नेत्या कल्पना काकू महाले, मा. महापौर जयश्री अहिरराव इ. उपस्थित होते .याप्रसंगी मालेगाव येथून किशोर चौधरी,दगा चौधरी,राजेश बडवणे ,पंकज चौधरी,रमेश उचित,भालचंद्र सूर्यवंशी,रमेश भिका चौधरी,सुभाष भिका चौधरी,माणिक चौधरी,हेमंत कर्डिले,शरद चौधरी,नंदू येशे,दिपक चौधरी इ. नी ही राहुल चौधरीचे सत्कारासाठी कौतुक  केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav