Bride / Groom Form

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने दिपावली स्नेह मिलन सोहळा

06 December 2023 Teli samaj 73 views

     वर्धा - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा वर्धा जिल्हयाच्या वतीने दिपावली स्नेहमीलन चे आयोजन आज दिनांक ०२/१२/२०२२ ला यमुना लॉन, नालवाडी येथे सायं. ०६.०० वा केलेले आहे. समाजातील सर्व बंधु भगिनींना, सर्व शाखेतील व संघटनेतील सदस्यांना कळविण्यात येते दिपावली स्नेहमिलन, स्नेह भोजन व सुगम संगीताच्या कार्यक्रमाला सामजिक बांधीलकी दृष्टीने सर्व समाज बांधवांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

    स्नेह मिलन कार्यक्रमाला प्रातांध्यक्ष खासदार रामदास तडस, महासचिव डॉ. भूषण कर्डीले, कोषाध्यक्ष नाना शेलार, सुनिल चौधरी, बळवंत मोरघडे, जगदीश वैद्य, जिल्हाध्यक्ष अतुल वादीले, माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाने, माजी आमदार राजु तिमांडे, माजी जि.प. अध्यक्ष नाना ढगे, शेखर शेंडे, प्रविण हिवरे, अतुल तराळे, रवीकांत बालपांडे, सेलु च्या नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, सुधिर चाफले, निळकंठ पिसे, शरद सहारे, गणेश इखार तसेच वर्धा जिल्हयातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.

    सर्व समाज बंधु भगीनीनी या दिपावली स्नेह मिलन कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व युवक आघाडी वर्धा जि ल्हयाच्या वतीने विपीन पिसे व चंद्रकांत चामटकर यांनी केले.

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar