वधु - वर फॉर्म

चामोर्शी, गडचिरोली येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य समाज प्रबोधन कार्यक्रम

06 December 2023 sant santaji maharaj jagnade 33 views

     संताजी स्नेही मंडळ, चामोर्शी ता. चामोर्शी, जि. गडचिरोली चे वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य समाज प्रबोधन कार्यक्रम दिनांक ०८ डिसेंबर २०२३ (शुक्रवार) दुपारी १२.०० वाजता स्थळ : बाजार चौक, नगरपंचायत, चामोर्शी. कार्यक्रमाचे अध्यक्ष ... मान. ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक. यशस्वी उद्योजक, टिमकी- भानखेडा, नागपूर.

     प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प. विजय महाराज गवळी " संतू-तुका" संगीत चरित्र कथाकार, छ. संभाजीनगर महाराष्ट्राला संत परंपरेचा एक मोठा इतिहास आहे. या संतानी तत्कालीन अनिष्ठ रूढी, परंपरा व अंधश्रद्धेवर फार मोठे कोरडे ओढले आणि समाजाला त्यातुन बाहेर काढुन समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला. पंरतु समाजाला कायम अंद्धश्रद्धेत ठेऊ इच्छिणाऱ्या प्रस्थापित वर्गाला हे खटकाणारे असल्याने त्यांनी संताचा सुद्धा फार मोठा छळ केला.

Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Samaj prabodhan karyakram - Chamorshi Gadchiroli     'नवसे कन्या पुत्र होती । तरी का करणे लागे पती ।।" असा अत्यंत विज्ञानवादी दृष्टीकोन रुजविणाऱ्या संत तुकारामाच्या पोथ्या इंद्रायणीत बुडवून त्यांचा खुन केला आणि ते सदेह वैकुंठाल गेले अशी कंडी पिकवली. त्यांचे शिष्य संत संताजी जगनाडे महाराजांना याचे अतिव दुःख झाले. म्हणुन त्यांनी गावोगाव फिरून संत तुकाराम महाराजांचे मुखोद्गत अंभग लिहून काढले आणि समाजाला जागृत करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. परंतु अजुनही समाज त्या जुन्या अनिष्ठ, रूढी, परंपरा व अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त झालेला दिसत नाही. याउलट समाज जितका अधिक उच्च शिक्षित होत आहे, त्या प्रमाणात तो अधिक अंधश्रद्धाळु होतांना दिसत आहे.

    प्रिय बंधुजनहो, ०८ डिसेंबर १६२४ हा संत जगनाडे महाराजांचा जन्मदिन आहे. त्याद्दष्टीने त्यांचे परिवर्तनवादी विचार, समाजात रूजावे, जनतेत वैचारीक परिवर्तन व्हावे, असे वाटते. कारण विचारांचा प्रभाव परिवर्तनवादी असेल तर कौटुंबीक जीवन प्रगतीपथावर जाईल. विचारात घडलेला बदल सवयी बदलतो, सवयीतुन व्यक्ती घडते व समर्थ लोकशाही राष्ट्र बनवायचे असेल तर परिवर्तनासाठी महापुरूषांना अभ्यासुन व वास्तव स्विकारून पुढे जावे लागेल. म्हणुन संत जगनाडे महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी आपण सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहावे. ही नम्र विनंती. आयोजक : संताजी स्नेही मंडळ, चामोर्शी

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh