Bride / Groom Form

संत संताजी जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळासाठी निधी

08 December 2023 sant santaji maharaj jagnade 137 views

राज्य सरकारकडून ६६ कोटी रुपये विकासासाठी मंजूर

    श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखी तळ मार्ग विकास आराखडा अंतर्गत मौजे सुदुंबरे (ता. मावळ, जि. पुणे) येथील श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधीचा विकास व सौंदर्यीकरण आराखड्यास मान्यता मिळाली असून, यासाठी ६६.११८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

Shri Sant Santaji Jagnade Maharaj at sudumbare Samadhi Mandir     श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधीचा विकास व्हावा यासाठी निधी देण्याची मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी गेल्या वर्षी केली होती.

    'संत जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी आहे. आज समाजात घडत असलेल्या अनुचित घटना लक्षात घेता समाजाला खऱ्या अर्थाने संतविचारांची गरज आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा कर्मठ लोकांनी बुडविली तेव्हा श्री संत जगनाडे महाराजांनी तिचे संकलन आणि पुनर्लेखन केले होते. त्यांनी स्वतः अनेक अभंग लिहून समाजाला शहाणे केले,' असे वडेट्टीवार म्हणाले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran