Bride / Groom Form

लातूर तेली समाजाच्‍या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात संपन्‍न

11 December 2023 sant santaji maharaj jagnade 115 views

      दिनांक ८ डिसेंबर संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे 400 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व लातूर जिल्हा सेवाभावी संस्थेच्या वतीने ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. अमोल बाल संस्कार केंद्रात जगनाडे महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून ही जयंती साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जी होलकांबे तसेच प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष श्री विश्वनाथ खडके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी सौ शुभांगी राऊत* यांनी संत जगनाडे महाराजांविषयी पहिले पुष्प वाहिले त्यांच्याविषयीची माहिती सांगितली व आठवणींना उजाळा दिला.

Sant Shiromani Santaji Jagannade Maharaj Jayanti celebrated with enthusiasm on behalf of Latur Teli Samaj     सर्वांनी पुतळ्याचे पूजन करून घोषणा दिल्या.यानंतर प्रांतिकतेलिक महासभेचे अध्यक्ष श्री विश्वनाथ खडके यांनी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर लहान मुलांना* खाऊ वाटप* करण्यात आला. याप्रसंगी लातूर जिल्हा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री होलकांबे साहेब, अनिल कलशेट्टी, नितीन फेसगाळे, भागवत कोरे सुनील देशमाने शंकर क्षीरसागर ,दिगंबर भुजबळ ,अनिल कलशेट्टी ,लक्ष्मण खडके ,अमोल राऊत ,विश्वनाथ खडके, प्सिद्धेश्वर खडके ,उमाकांजी राऊत, सुरेश होकळे, चौंडीकर साहेब तसेच छायाताई  चिंध्ये, सौ बबीता खडके, सौ संगीता देशमाने, सो सुरेखा खडके ,सौ शुभांगी राऊत, सौ सारिका राऊत शिवा बाई राऊत, शामल वाणी नंदिनी जोशी, तसेच सहशिक्षिका व शाळेतील मुले उपस्थित होते. अशाप्रकारे हा सोहळा मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

Sant Shiromani Santaji Jagannade Maharaj Jayanti celebrate by Teli Sama

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar