वधू - वर फॉर्म

संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांची जयंती विहामांडवा येथे उत्‍साहात साजरी

11 December 2023 teli samaj vadhu var melava 124 views

      विहामांडवा येथील सरस्वती सार्वजनिक वाचनालयात संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांची 399 जयंती करण्यात आली. साजरी जयंती निमित्त संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी विहामांडवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर, अंगद भिंगारे महाराज यानी संत शिरोमणी जगनाडे ची महती सांगितली. महाराज यांच्या जीवनचरित्र जगाचा कल्याणासाठीच संतांचे महत्त्व पटवून सांगितले कार्यकालात वाचनालयाचे पदाधिकारी, महेंद्र कुमार सकलेचा, विहामांडवा पोलीस चौकीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन काकरवाल, डॉ सचिन वाकडे पत्रकार ओमप्रकाश तुपकरी, शिवाजी नवपुते, भास्कर नवपुते, कैलास नवपुते. रामगोपाल धुत, फिरोज शेख, मांऊली गाभुड, विज्ञान काळे संजय मुरलीधर नवपुते, निंबाळकर, शिवाजी लोखंडे विकास काजळे, खुडे, गजू गाड, शिंदे, सचिन जैस्वाल नवनाथ झुंजे आदी वाचक उपस्थित होते.

Saint Santaji Jaganade Maharaj Jayanti celebrated in Vihamandwa Paithan Taluka

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu