संताजी ब्रिगेड व तेली समाज नागपूर च्या वतीने संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी
11 December 2023 sant santaji maharaj jagnade 65 views
नागपूर - संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासर्व महासभा नागपूरच्या संताजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बाईक रॅली शोभायात्रा रक्क्तान शिबिर असे विविध कार्यकमांचे आयोजन करून तैलिक समाजाचे वतीने संत शिरोमणी संत जगनाडे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पारडी येथून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेसह बाईक रॅली व शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशा पथक व पारंपारिक आखाड्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जगनाडे चौकात बाईक रॅलीचा समारोप झाला. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर व भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्ह्यातील गणमान्य व्यक्तींनी भेटी थोपटे देऊन संत जगनाडे महाराजांना आदरांजली वाहीले, संस्थापक अजय अध्यक्ष विजय हटवार, कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे, सहसचिव हितेश बावनकुळे, सदस्य नंदु धोपटे, सदस्य रमेश वंजारी, सदस्य अंकुश येळणे, संघटक प्रमुख गजानन तळवेकर, विदर्भ अध्यक्ष लोकनाथ भुरे, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कुजलकर, महासचिव महादेव घोपटे, नागपूर शहर अध्यक्ष सुनिल मानापुरे, महासचिव रोहन मोटघरे, उपाध्यक्ष कुमार बावनकर, सहसचिव परेश भनारे, उपाध्यक्ष देवेंद्र बारई, उपाध्यक्ष विठ्ठल तडस, सहसचिव विनोद पिसे, मीडिया प्रभारी अजय काबळे, दक्षिण नागपूर अध्यक्ष संजय बडवाईक, दक्षिण पश्चिम शैलेंद्र आंबुलकर, पूर्व नागपूर अध्यक्ष प्रतीक बावनकर, उपाध्यक्ष सुरेश थोपटे, विदर्भ सहसंघटक प्रमुख प्रतिभाताई खोब्रागडे नागपूर जिल्हा अध्यक्षा कविता रेवतकर, नागपूर शहर प्रमुख चित्रा माकडे, उपाध्यक्ष प्रणोती मानापुरे, प्रवक्ता डॉ, दिपा हटवार, पूर्व नागपूर अध्यक्षा नर्मदा तडस, दक्षिण अध्यक्षा, सोनाली टिकले, दक्षिण पश्चिम अध्यक्षा सोनल बावनकुळे, मध्य नागपूर, रजनी वैरागडे, दिलीप धनजोडे, युवा आघाडी व महिला आघाडी व वैद्यकीय आघाडी व संताजी ब्रिगेड औद्योगिक मंच, संताजी ब्रिगेड वधू वर परिचय मंडळ पदाधिकारी व अनेक समाज बांधव उपस्थित होते.
शेयर करा:
📺 संबंधित व्हिडिओ:
▶️
Click to load video
भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story