वधु - वर फॉर्म

काष्टीत सर्व धर्मियांनी एकत्र येत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती केली साजरी

13 December 2023 sant santaji maharaj jagnade 59 views

    श्रीगोंदा : काष्टी मध्ये सर्व जाती... धर्म ... पंथनी... एकत्र येऊन सर्व धर्म समभावाने राष्ट्रीय ऐक्य साधत... जगद्गुरु संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांची ३९९ वी जयंती जन्मोत्सव काष्टी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी केली.

In Kashti all religious gathered together and celebrated the birth anniversary of Santaji Maharaj Jaganade      याप्रसंगी जेष्ठ उरमुडे गुरुजी, सोमनाथ टिमुणे (उपसरपंच),बाळू काका रेगे, छबु नाना कोकाटे, शिवाजीराव म्हस्के, सरदार शेख मोहम्मद सय्यद, सोहेल शेख, सैनिक मेजर चांगदेव पाचपुते शरद कवडे (ग्राम सेवक) अमोल पवार (पंचायत समिती सदस्य) सौ ज्योतीताई जगताप , रवींद्र दांगट पाटील , रवींद्र जाधव, वसंत लोखंडे संदीप जाधव, सुरज जाधव, शरद गडदे, निलेश गडदे आदी सर्व समाज बांधव उपस्थित होते.

    यावेळी ह भ प मोहन महाराज उबाळे यांचे श्री संताजी महाराजांच्या जीवनपटावरील प्रवचन झाले. सूत्रसंचालन मदन गडदे यांनी तर आभार शरद कवडे (ग्राम सेवक) यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu