वधू - वर फॉर्म

पवनी तालुक्यात तेली समाजाचा उपवर वधू वर परिचय मेळावा संपन्न

22 December 2023 sant santaji maharaj jagnade 134 views

     पवनी तालुक्यात श्री संताजी स्नेही सेवा समिती तालुका पवनी च्या वतीने नुकताच उपवर वधू वर परिचय मेळावा व दिनदर्शिका चे अनावरण आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार मेळावा नुकताच संपन्न झाला या मेळाव्याचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नामदेव हटवार कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर संजय ढोबळे सह उद्घाटक डॉक्टर विनोद जैस्वाल त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट कोमल दादा गभने दिवाकरजी रोकडे डॉक्टर सौ गभने मडम प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाजी देशमुख यांनी केले तर संचालन विशाल बोरकर यांनी केले.

Pawni Taluka Bhandara teli Samaj aayojit Vadhu Var Parichay Melava      या मेळाव्याला परिसरातील हजारो तेली बांधव उपस्थित असुन अनेक वर वधू यांनी आपला परिचय दिला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विनोद जिभकाटे किशोर काटेखाये राकेश पाकमोडे दिनेश  काटेखाये   स्नेहलताबाई मोटघरे डॉक्टर योगेश वैद्य सुरेश हटवार बंडू बावनकर बाळू मुंडले रुपेश  बावनकर पुष्पाताई भुरे वंदना काटेखाये महेंद्र जुमळे नथुजी हटवार शंकरभाऊ तेल मासरे दीपक कावळे इत्यादी लोकांनी फार मोलाचे कार्य केले डा नामदेव  हटवार यांनी आपल्या भाषणातून भविष्यातील समाजातील आव्हाने पेलण्याकरिता समाज एक संघ राहायला हवा राजकीय सामाजिक व आर्थिक विकास साधण्याकरता समाज बांधवांनी एकमेकांना सहकार्य करायला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले कोमल दादा गभने  यांनी समाजाने सेवाभावाने काम केले पाहिजे असे आवाहन  केले कार्यक्रमाचे   आभार प्रदर्शन कांचन ताई गभने यांनी केले

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala