Bride / Groom Form

बेलापूरमध्ये तिळवण तेली समाजाची कार्यकारिणी जाहिर

31 December 2023 sant santaji maharaj jagnade 98 views

     बेलापूर  - बेलापूर येथील श्री संतजी जगनाडे महाराज मंदिरामध्ये नुकतीच तिळवण तेली समाजाची बैठक संपन्न झाली. सदरची बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकराव भिकचंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

    या बैठकीमध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये अध्यक्षपदी रविंद्र मच्छिंद्र जाधव, कार्याध्यक्षपदी प्रदिप गंगाधर साळुंके, सचिवपदी शेजूळ, सुरेश बळवंत सहसचिवपदी अनिल किशोर चोथे, उपाध्यक्षपदी विजय सुभाष नागले, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर गोरक्षनाथ जाधव, खजिनदारपदी मयुर अशोकराव जाधव, तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून विठ्ठल सोमनाथ शिंदे यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या.

    यावेळी तिळवण तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी आभार श्रीकांत अंबादास कोतकर यांनी मानले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia