वधु - वर फॉर्म

अंबडमध्ये संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त रॅली

13 January 2024 sant santaji maharaj jagnade 16 views

     अंबड शहरात श्रीसंत संताजी महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त सर्व तेली समाज बांधवांच्या वतीने ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी समाजातील महिला-पुरूष व लहान मुलांचा सहभाग होता. श्रीपद नारायण मंदिर येथून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. नाथ्रेकर चौक, महाराष्ट्र व्दार मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जालना - बीड रोडवरून श्री स्वामी समर्थ मंदिरात रॅलीची सांगता झाली. यानंतर मंदिरात ह.भ.प. मच्छींद्रनाथ पवार यांचे हरीकिर्तन करण्यात आले. त्यानंतर सर्व तेली समाज व इतर समाजातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Rally on Punyatithi of Santaji Jaganade Maharaj in Ambad

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj pune vadhu var melava