Bride / Groom Form

वीरशैव तेली समाज लातूर - महिला मंडळ आयोजित मकर-संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न

31 January 2024 sant santaji maharaj jagnade 136 views

     वीरशैव तेली समाज लातूर,महिला मंडळ आयोजित मकर-संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभ दिनांक 26 जानेवारी रोजी,वीरशैव सांस्कृतिक भवन लातूर येथे भव्य स्वरूपात पार पडला.याप्रसंगी समाजातील जेष्ठ महिला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. चंद्रकला कलशेट्टी,सौ.छायाताई चिंदे,सौ.छायाताई शेगावकर,सौ.सुमन राऊत, सौ.शोभा लोखंडे,सौ.महानंदा देशमाने सौ.जयश्री राऊत,सौ.तारामती राऊत,सौ. सविता ठेले,सौ.कुसुम भोसेकर,सौ.कमल व्यवहारे. उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत सौ.कुसुम पुदाले,व महिला समिति मेंबर यांनी केले .कार्यक्रमाची सुरवात महात्मा बसवेश्वरच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली.

Veershaiv Teli Samaj Latur - Mahila Mandal organized Haldi Kunku Samaranabh on the occasion of Makar Sankrant     या प्रसंगी ग्रीन लातूर वृक्ष टीम तर्फे सौ. दीपाली राजपूत यांनी वृक्ष लागवडीचे महत्व उपस्थित महिलांना सांगून ग्रीन लातूर वृक्ष टीम तर्फे सर्व महिलांना ४०० फुलांचे रोपटे वाण म्हणून देण्यात आले.तसेच कु.जान्हवी राऊत हिने श्री प्रभू रामचंद्र यांच्या वरील उत्कृष्ट गीत सादर केले.

Veershaiv Teli Samaj Latur - Mahila Mandal Haldi Kunku Samaranabh     या कार्यक्रमासाठी सर्व महिला मंडळा कडून अतिशय नियोजन बद्ध व काटेकोर पणे कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती.कार्यक्रम स्थळी सौ. अनुसाय देशमाने सौ. जयश्री बंगले यांनी देवीची मूर्ती तयार करून आकर्षक सजावट केली होती व सर्व महिलांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनली होती. सुबक आणि सुंदर रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती त्यासाठी सौ.वर्षा चोपडे सौ.सोनाली होकळे सौ.ज्योती गंगणे सौ. प्रियांका महेंद्रगीकर सौ.पूजा शेगांवकर यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. अंजली क्षीरसागर सौ. सारिका क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रम स्थळी नाव नोंदणी सौ.वैशाली देशमाने, सौ. ज्योति फेसगाळे,सौ.संगीता उदगीरे,सौ.उषा टाकणे,सौ.विदया टाकणे सौ.आश्विनी धुमाळे यांनी केली.आलेल्या सर्व महिलांना हळदी कुंकू,नाष्टा व वाण देण्याची जबाबदारी सौ.प्राजक्ता लोखंडे,सौ.अश्विनी लोखंडे सौ.माया कलशेट्टी सौ.सुरेखा संजय कलशेट्टी सौ.रोहिणी कलशेट्टी सौ.मेघा भुजबळ सौ.विजयमाला उदगीरे सौ.मीनाक्षी राऊत सौ.मनीषा भुजबळ सौ.रेखा कलशेट्टी सौ.रागिणी लोखंडे सौ.जयश्री बंगले,सौ.अनुसया देशमाने सौ.शुभांगी राऊत सौ.वनिता व्यवहारे यांनी पार पडली.

Veershaiv Teli Samaj Latur Mahila Mandal Haldi Kunku Samaranabh - Makar Sankranti     याप्रसंगी समाजातील सर्व महिला आपल्या लहान मुला बाळा सहित उत्साहाने उपस्थित होत्या. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी वीरशैव तेली समाज लातूर अध्यक्ष,जेष्ठ सल्लागार,सर्व संचालक मंडळ यांनी महत्वाचे योगदान दिले

Teli Samaj Latur Mahila Mandal Haldi Kunku Samaranabh - Makar Sankranti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh