वधू - वर फॉर्म

डॉ. मेघनाद साहा यांचे प्राथमिक शिक्षण

11 February 2016 Teli samaj 77 views

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 3) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी

शिक्षण :- प्रथमिक / माध्यमिक 
Dr Meghnad Saha         मेघनाद यानें शिक्षण न घेता आपला किरणा दुकानदारीत लक्ष घालावे असे त्यांच्या वडिलांचे विचार पण आपले मोठे बंधू जयंत व प्राथमिक शिक्षक यांच्या प्रयत्नाने व प्रेरणेने डॉ. मेघनाद यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणास गती मिळाली. शिवरातली गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती म्हणून गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिमुलीया येथे माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना डॉ. अनंतकुमार दास यांच्या कडे रहावे लागले. डॉ. अनंतकुमार दास यांनी त्यांची मोफत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली. बदल्यात पडेल ते कष्ट करण्याची जबाबदारी मेघनाद यांनी घेतली आणि अश्या रितीने मेघनाद यांचे शिक्षण सुरू झाले. गणित हा त्यांचा आवडता विषय होता. प्रसन्नकुमार चक्रवर्ती या त्यांच्या शिक्षकांनी या आवडीला प्रोत्सहन दिले. मेघनाद यांचा गणिताचा पाया अश्या रितीने मजबूत झाला. जिलह्यात पहिला क्रमांक मिळवीत त्यांनी माध्यमिक शिक्षण पुर्ण केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

kokanastha Teli Samaj Teli Ghana