Bride / Groom Form

चामोर्शीत संत जगनाडे महाराज पुतळा अनावरण होणार भव्यदिव्य

03 November 2024 sant santaji maharaj jagnade 96 views

स्नेही मंडळाचा उपक्रम : नियोजनासाठी पार पडली सहविचार सभा

     चामोर्शी : संताजी स्नेही मंडळ चामोर्शी यांच्या वतीने संत जगनाडे महाराज यांचा पुतळा अनावरण व प्राणप्रतिष्ठा सोहळा व जयंती महोत्सव साजरा करण्याचे हेतूने तेली समाजाची सहविचार चामोर्शी येथे संपन्न झाली.

     या उत्सवानिमित्त पालखी, रथयात्रा, भजन दिंडी, ढोल ताशे, महाप्रसाद, संताजी महाराज यांच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा, समाज प्रबोधन, कीर्तन आदी रंगारंग कार्यक्रम घेण्यात येणार असून संपूर्ण शहरात पालखी फिरवण्यात येणार आहे. यावेळी लोमेश बुरांडे, राहुल नैताम, आशिष पिपरे, निशांत नैताम, गुरुदेव सातपुते, विकास दूधबावरे, संजय कुनघाडकार, विलास चिचघरे, रोहिदास कुनघाडकर, प्रवीण नैताम, सतीश सोमनकर, बंडूजी नैताम, मोरेश्वर कोठारे, महेंद्र किरमे, गजानन बारसागडे, सुधीर भांडेकर, नकुल सातपुते, हेमंत सुरजागडे, प्रमोद पिपरे, गणेश चलाख, खुशाल दुधबळे, संजना सोमनकर, गणेश गव्हारे, नीरज पिपरे आदी समाज बांधव मोठ्ठया संख्येने उपस्थित होते. समाजबांधवांनी कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक राहुल नैताम, संचालन महेंद्र किरमे तर आभार गजानन बारसागडे यांनी मानले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya